नाशिक : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून | पुढारी

नाशिक : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून

वणी (जि.नाशिक), पुढारी वृत्‍तसेवा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कुऱ्हाडीने वार करुन ठार मारल्याची घटना घडली आहे. आरोपीच्या विराधात वणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, लहानु मोतीराम धोंगडे व नंदा लहानु धोंगडे हे पती पत्नी चाप्याचा पाडा, देवसाने तालुका दिंडोरी येथे वास्तव्यास होते. पत्नी नंदा यांचेवर पती लहानु हे नेहमी संशय घेत होता. यावरून यांच्यात सतत भांडण होत होते. भाडण्याच्या रागात पत्नीवर रागाच्या भरात लहानुने कुऱ्हाडीने त्‍याने डोक्यावर, मानेखाली खांद्यावर वार केले. यामध्ये तिचा जागीच मृत्‍यू झाला.

या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारासाठी नंदा यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी तिचा मृत्‍यू झाला होता. मयत नंदा यांचा भाऊ लक्ष्मण तुळशीराम धुम (वय 30) रा. चिकाडी सालभोये तालुका सुरगाणा यांनी लहानु धोंगडे यांचे विरोधात तक्रार दिली. यातक्रावरून लहानु याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा  

Back to top button