कोल्हापूर : गुणरत्न सदावर्तेंना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

कोल्हापूर : गुणरत्न सदावर्तेंना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : काेल्‍हापूर पाेलिसांनी (दि. 21) अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही पी गायकवाड यांच्या कोर्टात हजर केले. यावेळी न्‍यायालयाने त्‍यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे व फिर्यादी दिलीप पाटील यांचे वकील ॲड. शिवाजीराव राणे, सदावर्ते यांच्या बाजूने ॲड. पीटर बारदेस्कर यांनी युक्‍तीवाद केला. एक तासाहून अधिक युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरोधात फिर्याद दाखल झाल्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी त्यांचा ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. तो मंजूर होताच कोल्हापूर पोलिसांचे पथक ऑर्थर रोड कारागृहात गेले. तेथून अ‍ॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेऊन हे पथक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूरकडे रवाना झाले हाेते.

मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. ॲड. सदावर्ते यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्या तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करण्याचा सदावर्तेंचा प्रयत्न सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करणारा आहे, असेही दिलीप पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news