नाना पटोले : ‘मतपेटीतून जनताच भाजपची पोलखोल करेल’ | पुढारी

नाना पटोले : 'मतपेटीतून जनताच भाजपची पोलखोल करेल'

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आगामी निवडणूकांची तयारी सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण कामाला लागले आहे. त्यामुळे कोण, कोणाची पोलखोल करतात की आणखी काही करतात हे दिसेलच. शेवटी जनता समजदार आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि.२१) गुरूवारी माध्यमांशी बोलताना केले. योग्य वेळी जनता मतपेटीतून भाजपची पोलखोल करेल, अशी टीका पटोले यांनी केली.

केंद्रातील भाजप सरकार आपले अपयश झाकण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप पटोलेंनी केला. राज्यातील मुस्लिम समाजाने ७२ टक्के भोंग्याचे आवाज कमी केले. तर काहींनी भोंगे काढले आहेत. राज्यातील भाईचारा संपू नये यासाठी मुस्लिम समाज घेत असलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे नाना पटोले म्हणाले.

गुणरत्न सदावर्तेंकडे नोटा मोजण्याची मशीन सापडली, यावरून काय ते समजा. गेल्या पाच महिन्यात राज्यातील जनतेचे व एसटी कामगारांचे मोठे नुकसान यामुळे झाले आहे. भाजपने पाच महिने एसटीचे आंदोलन तेवत ठेवले. परिणामी जनतेला त्रास सहन करावा लागला. पण, एसटी कामगारांच्या मागण्या योग्य असून सरकाने त्यांना न्याय द्यावा असे पटोले म्हणाले.

Back to top button