‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमली लासलगाव नगरी ; जयंती उत्साहात | पुढारी

'जय महावीर'च्या जयघोषाने दुमदुमली लासलगाव नगरी ; जयंती उत्साहात

नाशिक (लासलगाव) वार्ताहर : कोरानाच्या संकटानंतर लासलगाव मध्ये दोन वर्षानंतर महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लासलगाव येथील सकल जैन समाजा तर्फे शहरात महावीर जयंती निमित्त भव्य शोभा यात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

सकाळी ९३ नंबर येथील जैन मंदिरापासून भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक सजावट असलेल्या सुशोभित अश्वरथातून सवाद्य, लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली. अहिंसा परमोधर्म की जय, वंदे विरम भगवान महावीर स्वामी की जय’, अशा आवेशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला. जैन बांधव, आबालवृध्दांसह महिला या शोभायात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाजातर्फे निबंध स्पर्धा, प्रश्नमंच स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, संगीत संध्या, रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते तर नाशिक येथील सुप्रसिद्ध व्याख्याते आदर्शकुमार जैन यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.

जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृध्द करणारे भगवान महावीर स्वामी यांची जयंती लासलगाव शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. महावीर जयंती उत्सव समिती व सकल जैन बांधवांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सरपंच जयदत्त होळकर, संघपती नितीन जैन, जि. प सदस्य डी. के जगताप, पं. स. सदस्य शिवा सुरासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, निलेश पटणी, डॉ. विजय बागरेचा, प्रकाश दायमा, संतोष पलोड, प्रकाश पाटील, योगेश पाटील, ओमप्रकाश राका, संतोष ब्रम्हेचा, सुनील आबड, सुरेश नाहटा, निर्मल लुंकड, सचिन दगडे, मनोज शिंगी, डॉ. स्वप्निल जैन, निलेश छाजेड, महावीर नाहटा, मनोज मुथा, स्वप्नील डुंगरवाल, निलेश ब्रम्हेचा, गिरीश साबद्रा, सचिन होळकर, राजेंद्र चाफेकर, मनीष चोपडा, राजेंद्र पटणी, वृषभ भंडारी, सुरेश चोरडिया, विनोद ताथेड, पंकज आबड, नूतन चोरडिया, सुरेखा बागरेचा, सुनंदा डुंगरवाल, स्नेहल ब्रम्हेचा, मयुरी भंडारी, हर्षाली बोरा, उज्वला जैन, कोमल जैन, प्रियंका डुंगरवाल, श्वेता मुथा, पूजा बोरा आदी जैन बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button