नाशिक : सिन्नर नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम; नेहरू चौक ते गंगावेस भागात कारवाई | पुढारी

नाशिक : सिन्नर नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम; नेहरू चौक ते गंगावेस भागात कारवाई

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा: ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव शुक्रवारी (दि. 15) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात भाजी विक्रेते, पथारी, हातगाडीवाले यांना नोटिसा बजावून अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. याबाबत यात्रा कमिटी व भैरनाथ मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी वाहतूक कोंडी व भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मागणी केली होती.

मुख्याधिकारी संजय केदार, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे कर्मचारी व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. मंगळवारी (दि. 12) दुपारी नेहरू चौक परिसरातून अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या. यापूर्वीही सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, भाजीविक्रेते, हातगाडीवाले यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे नगर परिषदेने ही मोहीम हाती घेण्यात आली. नाशिक वेस, गंगा वेस तसेच भैरवनाथ मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
नगर परिषदेचे 10 ते 12 कर्मचारी तसेच पाच ते सहा पोलिस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

रोजचा बाजार शुक्रवारी बंद
भैरवनाथ महाराज यात्रेच्या दिवशी शुक्रवारी (दि. 15) नाशिक वेस ते गंगा वेस तसेच भैरवनाथ मंदिर परिसर, सरस्वती पूल, खासदार पूल परिसरात भाजीविक्रेते, हातगाडीवाले आदींनी दुकाने थाटू नयेत, असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रोजचा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. सूचनेचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा केदार यांनी दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button