

पुढारी ऑनलाईन डेस्क
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने (Mrinmayee Godbole) मराठी चित्रपट चि. व चि. सौ. का मध्ये काम केले. या चित्रपटात की ललित प्रभाकरसोबत दिसली होती. या चित्रपटाने तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. प्राण्यांच्या डॉक्टरची भूमिका साकारणारी मृण्मयी रिअल लाईफमध्येही प्राणी प्रेमी आहे. अनेक मराठी चित्रपट आणि वेबसीरीजेमध्ये काम करून मृण्मयीने स्वत:ला सिध्द केलं आहे.
एमएक्स प्लेयरवरील सीरीज 'हाय (High)' मध्येही ती झळकली होती. ड्रग्ज सारखा मुद्दा प्रकाशझोतात आणणारी ही वेबसीरीज होती. हाय या वेबसीरीजमध्ये तिने एका पत्रकाराची भूमिका साकारली होती.
मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सुंदर फोटोज पोस्ट केले आहेत. तिचा हा फोटोशूट बोल्ड, हॉट आणि स्टनिंग आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला खूप साऱ्या कमेंट्स द्यायला सुरुवात केलीय.
एका नेटकऱ्याने म्हटलंय-मला क्षणभर वाटलं नोरा फतेहीचं आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय-Golden beauty, आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय-Wow ❤️❤️ hot ? Marathi Mulgi ?? gajab ?? what a hot ? dress .. God bless you and your family ??, You Stunner ????????????. बऱ्याच नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत.-Ufff hotness ?????.
तसे पाहिले तर खऱ्या आयुष्यातही मृण्मयी प्राणीप्रेमी आहे. चि. व सौ. का मध्येही ती एक प्राण्यांची डॉक्टर दाखवण्यात आलीय. या चित्रपटासाठी तिने कुंग फू देखील शिकला. कारण, एका प्रसंगात तिचे ललितसोबत फाईट सीन्स होते.
ती आपल्या डॉगीसोबत सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. केवळ मृण्मयीच नव्हे तर असे अनेक मराठी सेलिब्रेटी आहेत जे रिअल लाईफमध्ये प्राणीप्रेमी आहेत. त्यात मुक्ता बर्वे, मानसी नाईक, पूजा सावंत, शशांक केतकर या कलाकारांचा समावेश आहे.
तिने गश्मीर महाजनीसोबतही काम केलं आहे.
मृण्मयीने आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपट राजवाडे अँड सन्स मधून केली होती. तिने चिंटू आणि चि व सौ का यामध्येही उत्तम अभिनय केला आहे.
चिंटू, चि व सौ का, सीआरडी, झिम्मा, ये रे ये रे पैसा २, कन्यादान, राजवाडे ॲण्ड सन्स, तिचा बाप, त्याचा बाप, स्माईल प्लीज, पॅडमॅन, प्रदोष या सारख्या चित्रपटांमध्ये ती झळकलीय.