कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ शहर परिसर व कविलकाटे परिसरात रविवारी (दि.१६) भटक्या कुत्र्याने १५ जणांवर हल्ला करून चावा घेत जखमी केले. चालत्या मोटरसायकलस्वारांवर या कुत्र्याने हल्ला करत त्यालाही जखमी केले. जखमींवर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. परिसरात या कुत्र्यांची दहशत सुरूच होती. यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहनधारक, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थी वर्ग या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचले. कुडाळ शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जखमींमध्ये दहा वर्षांच्या मुलांपासून साठ वर्षांच्या व्यक्तींचा समावेश आहे. या घटनेसंदर्भात कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधला. मात्र, कुडाळ शहरातील भटक्या कुत्र्याच्या निर्बिजीकरणाबाबतच्या कामाचे टेंडर प्रक्रिया चालू असून निवडणूक आचारसंहिता संपताच पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
हेही वाचा :