धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधील पिंपळनेर येथील वनविभागाच्या पथकाने उमरपाटा ते महूमाळ खोकसा गावाजवळ सापळा रचून १.२९७ घनमीटरचे १७ नग सागवानी लाकूड जप्त केले आहे. या कारवाईत वाहनासह १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
वनविभागाच्या पथकाने १०. ३० वाजेच्या सुमारास उमरपाटा ते महूमाळ खोकसा गावाजवळच्या रस्त्यावर सापळा रचून सागवानी लाकडाची वाहतूक करणारे वाहन क्र. एमएच १२ बीडब्ल्यू ४५४५ पकडले. मात्र वाहन सोडून चालक पसार झाला. कारवाईत ६ हजार ५०० रुपये किमतीचे १.२९१ घनमीटरचे १७ नग सागवानी लाकूड, १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहाय्यक वन संरक्षक एस.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अरुण माळके, वनपाल मच्छींद्र बच्छाव, भूषण वाघ, ए.पी.पवार, योगेश पवार, गुलाब बारीस, देविदास देसाई, एस.ए. सूर्यवंशी, के.एस.पवार, नाना विभांडीक, दिनेश घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.