Sonalee kulkarni : चंद्रावर थिरकली अप्सरा, नऊवारीत कमालीचा डान्स (video) | पुढारी

Sonalee kulkarni : चंद्रावर थिरकली अप्सरा, नऊवारीत कमालीचा डान्स (video)

पुढारी ऑनलाईन : प्रसाद ओक दिग्दर्शित बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात चाहत्यांना घायळ करणाऱ्या नृत्यांगणेची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली आहे. या भूमिकेसाठी अमृतावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच दरम्यान अनेक जण ‘चंद्रमुखी’ वर रिल्स बनवत आहेत. तर मराठमोळी अभिनेत्री अप्सरा सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni ) देखील अमृताच्या चंद्रा या गाण्यावर धमाकेदार डान्स करून चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

दिग्दर्शक प्रसाद ओक यांचा बहुचर्चित आगामी ‘चंद्रमुखी’ ( chandramukhi ) हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे. याआधी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. यातून चंद्रमुखीची मुख्य भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर हिने साकारल्याचे समोर आले. यानंतर चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली. यानंतर चाहत्यांना चित्रपटाची नायकेची भूमिका पसंतीस उतरली. याच दरम्यान अनेक जणांनी गाण्याच्या रिल्स बनवताना दिसतायेत.

याच दरम्यान मराठीतील अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ( sonalee kulkarni ) चंद्रा या गाण्यावर ठूमके लगावले आहेत. यावेळी सोनालीने केसरी रंगाच्या नऊवारी साडीत खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. या गाण्याचा व्हिडिओ सोनालीने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत खास म्हणजे, सोनालीच्या डान्स स्टेपने चाहत्याना भारावून सोडले आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शमनमध्ये तिने ‘लावणीच्या प्रेमाखातर आणि त्याचबरोबर ‘हिरकणी’ टीम विशेषतः प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे यांच्या प्रेमाखातर हा ‘चंद्रा’ वर नाचण्याचा मी प्रयत्न केला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा.’ असे लिहिले आहे. यातून तिने चंद्रामुखीच्या सर्व कलाकारांचे तिने कौतुक केले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह मराठी कलाकारांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात अभिनेता सुबोध भावेने ‘कमाल 👏👏👏’, अभिनेत्री सायली संजीवने ‘Sonaa 😍😍😍 अशक्य ❤️’, स्पृहा जोशीने ‘Such a lovely gesture Sona bai ❤️’ आणि अमृता सुभाषने ‘That’s why I love you ❤️❤️❤️’ . असे लिहिले आहे. तर काही युजर्सनी ‘अप्सरा…😍😍🔥🔥’, ‘क्यूट सोनाली’, ‘अप्सरा…😍😍🔥🔥’आणि ‘सुपर’ असे म्हटले आहे. तर काही युजर्सनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

यापूर्वी चंद्रा गाण्यावर एका आजीबाईंनी देखील भन्नाट डान्स केला होता. त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे संगीत लाभले आहे. हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button