नाशिक : नांदूरमध्यमेश्वर जलद कालव्यात पडून वृद्धाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : नांदूरमध्यमेश्वर जलद कालव्यात पडून वृद्धाचा मृत्यू

नाशिक (देवगाव) पुढारी वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील रुई शिवारातील नांदूरमध्यमेश्वर जलद कालव्यात बुडून 71 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. दत्तू भीमाजी तासकर (71, रा. रुई) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

शुक्रवारी (दि. 1) सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. पोलिसपाटील योगेश झुुरळे यांनी पोलिसांना खबर दिली. याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सहायक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button