नाशिक : विवाहेच्छुकांची फसवणूक करणारी दलालांची टोळी गजाआड | पुढारी

नाशिक : विवाहेच्छुकांची फसवणूक करणारी दलालांची टोळी गजाआड

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
शहर व परिसरातील विवाहेच्छुक तरुणाला मुलगी दाखवून विवाह लावून देण्याच्या बहाण्याने येवल्यातील केदार कुटुंबाचा तीन लाखांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, टोळीतील संशयित मुख्य असलेल्या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

विवाहेच्छुक तरुणाची आई लता केदार यांच्या तक्रारीनुसार, येवला शहर पोलिसांत काही दिवसांपूर्वी विवाह लावणारे दलाल असलेले संशयित साहेबराव विठ्ठल गिते (रा. ब—ाह्मणवाडे, ता. सिन्नर) आणि संतोष मुरलीधर फड (रा. भुसे भेंडाळी, ता. निफाड) यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणी येवला शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे व सहायक निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी पोलिस उपनिरीक्षक मनोहर मोरे, हवालदार दीपक शिरुड, राकेश होलगडे, गणेश घुगे, माई थोरात यांच्यासोबत तक्रारदाराने दिलेल्या पुराव्यावरून तपास केला. त्यात दोघा मुख्य संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, त्यांच्या टोळीतील इतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून, लवकरच संपूर्ण टोळीला गजाआड केले जाईल अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी दिली आहे. दरम्यान, अशा पद्धतीने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button