जळगाव : बाभूळगाव शिवारात बिबट्याने पाडला गाईचा फडशा | पुढारी

जळगाव : बाभूळगाव शिवारात बिबट्याने पाडला गाईचा फडशा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव शिवारातील तुकाराम धनगर पाटील यांच्या शेतात रात्री तीन वाजण्याच्या सुमारास गाईवर बिबट्याने हल्ला केला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बाभूळगाव शिवारातील तुकाराम पाटील यांच्या शेतात मंगळवार (दि.१५ मार्च) रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास शेतात बाधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला केला. या हल्यात गाईचा जागीच मृत्यू झाल्याने बाभूळगाव येथील शेतकऱ्यांच्याच भितीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी शिवाजी माळी आणि टिम पोहोचली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळवून देऊ व त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करू असे आश्वासन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला दिले.

अचानक झालेल्या बिबट्याचा हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. यावेळी लवकरात- लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बाभूळगाव ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना केली.

हेही वाचलंत का? 

(video : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट )

Back to top button