नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मेघालय उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे की, कपडे न काढता जबरदस्तीने सेक्सचा प्रयत्न करणे देखील बलात्काराच्या श्रेणीत येते आणि आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 375 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.
मूख्य न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी आणि न्यायमूर्ती डब्ल्यू. डिएंगडोह यांच्या खंडपीठाने १० वर्षाच्या मुलीवरील कथित बलात्काराच्या प्रकरणाची सुनावणी करताना वरील मत व्यक्त केले. तसेच कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवला ज्यामध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्तींनी सांगितले की, आठवडाभराच्या वैद्यकीय तपासणीनंतरही मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असून तिच्या लैंगिक संबंधाचे पुरेसे पुरावे आहेत.
मात्र, आरोपीने पीडित मुलीचे कमरेच्या खालील कपडे काढले नसल्याचा दावा आरोपीने केला. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी, सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला २५ हजार रुपयांच्या दंडासह १० वर्षांची शिक्षा सुनावली. या आदेशाला दोषीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते आणि म्हटले होते की, मुलीची अंतर्वस्त्रे काढली नसल्यामुळे तिच्यावर बलात्काराचा आरोप करता येणार नाही.
त्याच वेळी, उच्च न्यायालयाने सांगितले की पीडित महिलेने दावा केला की तिला त्यावेळी वेदना जाणवल्या नाहीत. १ऑक्टोबर २००६ रोजी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा तिने वेदना झाल्याची तक्रार केली आणि वैद्यकीय अहवालाने याची पुष्टी केली.
न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, पीडित अल्पवयीन असल्याने आणि अपील कर्त्याने कबूल केले की त्याने स्वतःवरील नियंत्रण गमावले आणि गुन्हा केला. त्यामुळे दिलेली शिक्षा अन्यायकारक वाटत नाही.
हे ही वाचलं का ?