नाशिक : वाढोली परिसरात वन्यजीव तस्कर जेरबंद | पुढारी

नाशिक : वाढोली परिसरात वन्यजीव तस्कर जेरबंद

नाशिक (त्र्यंबकेश्वर) पुढारी वृत्तसेवा : जिल्यातील वाढोली येथे वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. तुकाराम दिवे, हरी तानाजी जाधव, काळूबाळू बेंडकोळी, विष्णू सोनू शिंदे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

संशयितांकडून शिकारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील मौजे वाढोली परिसरात वनविभागाचे पथक गस्त घालत होते. त्याचवेळी कक्ष क्रमांक 520 च्या जवळ काही व्यक्ती संशयस्पद हालचाली करताना आढळून आले. चौघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वनकर्मचार्‍यांचा संशय बळवला.

त्यांनी संशयितांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन कोयते, एक विळा, 31 काठ्या, दोन मोटारसायकली आणि 8 वाघरी आदी साहित्य आढळून आले. दरम्यान, चौघा संशयितांविरोधात वनविभाग कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. चौघा संशयितांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. वनविभागाच्या सतर्कतेने वन्यजीवांचे प्राण वाचल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button