Google Chat : आता गूगल ‘हॅगआउट’ची जागा घेणार ‘गूगल चॅट’ | पुढारी

Google Chat : आता गूगल 'हॅगआउट'ची जागा घेणार 'गूगल चॅट'

 पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसातच Google Hangout ची जागा Google Chat घेणार असून, यावरील माहितीचा बॅकअप सेव्ह करून ठेवण्याचे आदेश युजर्संना देण्यात आले आहेत. गुगल स्वत: Google Hangout वर्कस्पेस वापरकर्त्यांना गुगल चॅटवर शिफ्ट करेल, पण यापूर्वी Google Hangout ची माहिती सेव्ह करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.

Google Chat सेवा २२ मार्चपासून कार्यान्वित होणार

तुम्ही गुगलची Google Hangout ही मेसेजिंग सेवा वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी आहे. गुगल Google Hangout हा प्लॅटफॉर्म बंद करून त्याऐवजी गुगल चॅट ही नवीन चॅट मेसेजिंगसेवा मार्केटमध्ये आणत आहे. ही सेवा २२ मार्चपासून कार्यान्वित होणार आहे, तरी Google ने वापरकर्त्यांना माहिती बॅकअप घेण्यास सांगितले आहे.

Gmail किंवा Hangout मोबाइल अॅपवरून या सेवेत प्रवेश केल्यास, वापरकर्त्यांना आपोआप Google Chat वर नेऊन ठेवले जाईल. मार्च २०२२ पासून, Google Chat मध्ये नवीन तयार केलेली कोणतीही जागा Google Hangout मध्ये दिसणार नाही.,. म्हणजेच Google Hangout वरील सर्व चॅटींग, मेसेज आपल्याला फक्त Google Chat मध्ये दिसणार आहे.

असा घ्या बॅकअप

तुम्हाला Hangouts चा बॅकअप घ्यायचा असेल, तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • प्रथम Hangouts वर जा.
  • सेटिंगमध्ये जाऊन, चॅट पर्याय निवडा.
  • यानंतर तुम्हाला ‘एक्सपोर्ट मेसेज’चा पर्याय निवडावा लागेल.

हेही वाचलंत का ?

Back to top button