करीना कपूरची जपानी लव्हस्टोरी, डिजिटल डेब्यू लवकरच

kareena kapoor
kareena kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आता ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ती एक जपानी प्रेमकथा पडद्यावर आणणार आहे. त्याचे दिग्दर्शन सुजॉय घोष करत आहेत. हा चित्रपट २००५ च्या जपानमधील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या "द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स" या पुस्तकावर आधारित मर्डर मिस्ट्री असेल. यामध्ये अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मा देखील असतील. विद्या बालन स्टारर "कहाणी" आणि तापसी पन्नूचा "बदला" सारख्या थ्रिलर चित्रपटांचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे.

सुजॉय घोष म्हणतात- चित्रपटासाठी कीगो हिगाशिनोची कादंबरी पडद्यावर आणण्यासाठी ते खूप उत्साहित आहेत.

आतापर्यंतची सर्वोत्तम प्रेमकथा

दिग्दर्शक घोष यांनी म्हटले आहे-"द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स" ही कदाचित मी आतापर्यंत वाचलेली सर्वोत्कृष्ट प्रेमकथा आहे आणि तिला चित्रपटात रूपांतरित करण्याची संधी मिळणे हा सन्मान आहे. तसेच, मला करीना, जयदीप आणि विजयसोबत काम करण्याची संधी मिळते! यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते."

या चित्रपटाशी जोडली गेल्याने करीना खूप खूश आहे. २०२० मध्ये आलेल्या "अंग्रेजी मीडियम" या चित्रपटात करीना शेवटची मोठ्या पडद्यावर दिसली होती. त्यालाही या प्रकल्पाशी जोडल्याचा आनंद आहे. ती म्हणाला, "ही एक अशी कथा आहे ज्यामध्ये सर्व काही ठीक आहे. एक उत्कृष्ट कथा, एक दूरदर्शी दिग्दर्शक आणि सुपर टॅलेंटेड कलाकार आणि क्रू सदस्य. मी सुजॉय, जयदीप आणि विजय यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. ही एका रोमांचक प्रवासाची सुरुवात आहे आणि ही कथा जिवंत होण्याची मी आता अधिक प्रतीक्षा करू शकत नाही."

करीना मालदिवमध्ये!

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सोमवारी ती प्रायव्हेट जेटने मुंबईहून रवाना झाली होती. तिच्यासोबत तिची दोन मुले बेटे जेह आणि तैमूरदेखील होते. सोबत करिश्मा कपूरचा मुलगा कियानदेखील होता. करीनाने ट्रिपचा एक फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केलीय. यामध्ये कियान – तैमूर समुद्र किनारी धावताना दिसत आहत. करीनाने कॅप्शनमें लिहिलं- ब्रदर्स. सोबत रेड हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. पुढे करिश्मा कपूरला टॅग केलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news