नाशिक : महिलेच्या नावे अश्लील मजकुराचा कागद इमारतीत टाकून चोर पसार | पुढारी

नाशिक : महिलेच्या नावे अश्लील मजकुराचा कागद इमारतीत टाकून चोर पसार

नाशिक : शिंगाडा तलाव परिसरातील एका इमारतीत चोरट्याने चोरी करून सुमारे 13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्याने घरमालक महिलेच्या नावे अश्लील मजकुराचा कागद इमारतीत टाकून पळाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहेे.

या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 13 फेब—ुवारी ते 2 मार्चदरम्यान चोरट्याने चोरी करून घरातील तीन लाख 75 हजार रुपयांचे 12.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर 7 मार्चला सायंकाळच्या सुमारास महिलेची बदनामी होईल, असा मजकूर लिहून तो कागद इमारतीत टाकून महिलेची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने चोरीचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :

Back to top button