पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल काही तासांतच लागणार आहे. त्यानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. आज दुपारपर्यंत निकाल समोर येईल, मात्र सध्या चौबट्टाखाल मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहेत. सर्व राजकीय पक्ष, सरकार आणि प्रशासनाची नजरही त्या मतदारसंघावर लागून राहिलेली आहे. कारण, कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज पुन्हा या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिलेले आहेत.
पौडी जिल्ह्यातील चौबट्टाखाल विधानसभेच्या जागेवरील होणारी लढाई ही खास आहे. कारण, हा मतदारसंघ हाॅट सीट मानला जात आहे. या मतदारसंघातून कॅबिनेटमंत्री सतपाल महाराज निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, तर त्यांच्या विरोधात काॅंग्रेसचे उमेदवार केसर सिंह नेगी आहेत. २०१७ मध्ये सतपाल महाराज यांनी राजपाल सिंह बिस्ट यांचा ७ हजार ३५४ मतांनी पराभव केला होता.
यंदाच्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या भाजपाने रिंगणात कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांना उतरवून एक भरोसा दिला. तर काॅंग्रेसने केसर सिंह यांना त्यांच्या विरोधात उतरवले होते. मागील ५ वर्षांच्या सत्तेमध्ये मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत सतपाल महाराज होते. मात्र भाजपाने मुख्यमंत्री पद दुसऱ्याच्या हाती दिली. २०१४ मध्ये सतपाल महाराजांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०१७ मध्ये सतपाल महाराजांनी काॅंग्रेसच्या राजपाल सिंह बिस्ट यांना ७ हजारांपेक्षा जास्त मतांनी हरवले होते.
हे वाचलंत का?