नाशिकरोडला साकारणार ‘मल्टी मॉडेल हब’; ’महारेल’ने मागविल्या निविदा | पुढारी

नाशिकरोडला साकारणार ‘मल्टी मॉडेल हब’; ’महारेल’ने मागविल्या निविदा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिकरोड रेल्वेस्थानक येथील मल्टी मॉडेल हब उभारणीसाठी ’महारेल’ने कंत्राटदारांकडून निविदा (लेटर ऑफ इंटरेस्ट) मागविल्या आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटणार आहे.

गेल्या वर्षभरापासून नाशिकरोड येथील मल्टी मॉडेल हब चर्चेत आहे. ’महारेल’कडून उभारण्यात येेत असलेल्या या हबमध्ये नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, नाशिक मेट्रो निओ आणि महापालिकेची सिटीलिंक बससेवा एकाच छताखाली येणार आहे. महारेल, मेट्रो, रेल्वे आणि नाशिक मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने 50 मजल्यांचे हे मल्टी मॉडेल हब उभारण्यात येणार आहे. भविष्यात या हबच्या माध्यमातून प्रवाशांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नाशिकरोड येथील रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटून त्याला कॉर्पोरेट लूक मिळणार आहे.

नाशिकरोड येथील या भव्यदिव्य हबमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे आणि निओ मेट्रोच्या भूमिपूजनापूर्वीच हब उभे राहणार असून, त्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. मल्टी मॉडेल हबचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी ’महारेल’ने इच्छुक कंत्राटदारांकडून निविदा मागविल्या आहेत.

असे असेल हब
नाशिकरोड येथील 50 मजली मल्टी मॉडेल हबच्या पहिल्या मजल्यावर नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेलाइन असेल. दुसर्‍या मजल्यावर मेट्रो निओ असणार असून, त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे. हबमध्ये याव्यतिरिक्त रेल्वे ऑपरेशन स्टाफ, मॉल, रेस्टॉरंट, शॉप्स, तिकीट कलेक्शन कार्यालय, सर्क्युलेशन काउंटर, वेटिंग लॉन, फूड कोर्ट, रेल्वेचे किचन, कॅफे, म्युझियम, सिनेमागृह, लायब—री, जिम्नॅशियम आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button