Congress on PM Modi : चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल | पुढारी

Congress on PM Modi : चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लडाखच्या पूर्व भागातील पॅगॉंग त्सो येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीला चार वर्षे पूर्ण झाल्याची आठवण काढून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियावरील एक्सवरुन हल्ला चढविला आहे. Congress on PM Modi

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केलेल्या पोस्टमधून चीनच्या अपयशाची जबाबदारी तुम्ही, कधी स्वीकारणार आहात, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला आहे. देपसांग आणि डेमचोक भागात हजारों चौरस किलोमीटर जागेवर चीनने ताबा मिळविला असताना केंद्र सरकारने आत्मसमर्पण केले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. Congress on PM Modi

पॅगॉंग त्सो येथील वादग्रस्त क्षेत्रात २०२० पूर्वीची स्थिती पुन्हा आणण्यासाठी केंद्र सरकारकडून कुठले प्रयत्न केले जात आहे, अशी विचारणाही काँग्रेसने केली आहे. चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच  भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. त्याचा दुर्दैवी अंत  १५ जून २०२० रोजी झालेल्या गलवान दुर्घटनेत झाला होता. त्यामध्ये आपले २० वीर जवान शहीद झाले होते.

या दुर्घटनेच्या चार दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी चीनला क्लीन चीट दिली होती. भारताच्या सीमेवर कोणीही अतिक्रमण केले नसल्याचा दावा पंतप्रधानांनी केला होता. पंतप्रधानांच्या या विधानाचा निषेध करून हे विधान म्हणजे, आमच्या शहीद जवानांचा घोर अपमान असल्याचेही रमेश यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button