Girish Mahajan | आमच्या सोबत असताना सगळं गोड लागलं आणि आता.. गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं | पुढारी

Girish Mahajan | आमच्या सोबत असताना सगळं गोड लागलं आणि आता.. गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

जळगाव पुढारी वृत्तसेवा- आमच्या भरोशावर 15 जागा खासदाराच्या व 55 जागा आमदाराच्या निवडून आल्या. आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलायचं असा टोला उद्धव ठाकरे यांना ना. गिरीश महाजन यांनी लगावला आहे.  जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात 13 तारखेला मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाजन यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी भाजपाची लाड वंजारी कार्यालयामध्ये बैठक झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाजन म्हणाले की, आमच्या सोबत असताना त्यांना सर्व गोड लागले. आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलतात. त्यावेळेस कौतुक करत होते. आमच्याबरोबर युतीमध्ये पंधरा जागा खासदाराच्या निवडून आल्या. तर 55 जागांवर आमदार निवडून आले ते कोणाच्या भरोशावर असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना केला. जर आम्ही सोबत नसतो तर याही जागा निवडून आल्या नसत्या. त्यावेळेस तोंड भरून कौतुक केले, आता काहीही बोलतात. आता लोकांनीच त्यांना त्यांच्या पक्षातून बाहेर काढले. आता कितपत टीका करणे योग्य आहे असे गिरीश महाजन म्हणाले.

आपापल्या पक्षाचा प्रचार त्यांनी करावा. घोडा मैदान दूर नाही. 13 तारखेला मतदान व 4 तारखेला मतमोजणी आहे. त्यावेळेस चित्र स्पष्ट होईल की कोणाचा दावा खरा आणि कोणाचा दावा खोटा आहे. तर जळगाव व रावेर लोकसभेमधून गेल्यावेळी साठ टक्के मतदान भाजपाला झाले होते. यावेळेस त्यापेक्षाही अधिक मतदान होईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

Back to top button