uttar pradesh election : योगी येणार पण जागा घटणार | पुढारी

uttar pradesh election : योगी येणार पण जागा घटणार

दिगंबर दराडे ; पुढारी वृत्तसेवा : उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा सरकार स्थापन करतील. मात्र मागच्या वेळी आलेल्या तीनशे जागांचा आकडा यावेळी त्यांना पार करता येणार नाही. तर सपाची मजल दीडशे जागापर्यंत जाईल. या ठिकाणी मात्र एमआयएम फॅक्टर फारसा चालणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे. (uttar pradesh election)

युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शाह यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. यूपी विधानसभेत एकूण ४०३ जागा आहेत आणि बहुमतासाठी २०२ जागा आवश्यक आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ७ टप्पे करण्यात आले होते. १०, १४ , 20 , 23 , 27 फेब्रुवारी आणि 03 मार्च रोजी मतदान पार पडलं.

भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे, पण त्यांना किमान ८० ते ९० जागांचे नुकसान होत आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व त्यांचा पक्ष ३०० चा आकडा पार करणार असल्याचा दावा करत आहेत. मात्र ती परिस्थिती या निवडणुकीत पहायला मिळणार नाही. उत्तर प्रदेशचं युद्ध कोण जिंकतं हे लवकरच स्पष्ट होईल.

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा कमळ फुलण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्य भाजपाला २२३-२२८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर समाजवादी पक्षाला १३८-१५७ जागा मिळतील. उत्तर प्रदेशमध्ये बसपाला ५ – ११ तर काँग्रेसला ४ – ७ जागांवर समाधान मानावं लागणार आहे.

प्रचारसभेत जोरदार आरोप प्रत्योराप पहायला मिळाले. भाजप आणि सपात चुरशीची लढत झाली. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप पहिल्या स्थानावर असला तरी गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४०३ जागांपैकी तब्बल ३१२ जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. त्यावेळी मोदी लाटेचा फायदा उत्तरप्रदेशमध्ये भाजपला झाल्याचं बोललं जात आहे. (uttar pradesh election)

ऐकेकाळी पुर्ण उत्तर प्रदेशवर आपली एकहाती सत्ता गाजवणारा मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षला मात्र जास्त जागा मिळवू शकत नसल्याचं चित्र आहे. तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात स्त्रीयांसाठी अनेक आश्वासन दिली तरी देखील त्यांना युपीतील जनतेन काँग्रेसला जास्त पसंती दिली नसल्याचं चित्र समोर येत आहे.

Back to top button