पेठ-नाशिक रस्त्यावर बर्निंग कारचा थरार | पुढारी

पेठ-नाशिक रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

पेठ, पुढारी वृत्तसेवा : पेठ-बरस्त्यावर सांयकाळी साडेसहा च्या सुमारास ओमिनी आणि पिक- अप यांची समोरा समोर धडक झाली. यानंतर काही क्षणात ओमिनीने पेट घेतला. या अपघातात प्रवासी दाम्पत्य जखमी असून करंजाळी (ता.पेठ) येथे उपचारासाठी त्‍यांना दाखल करण्यात आले.

पेठ तालुक्यातील म्हसगण येथील संजय भोये व मंगल भोये हे दाम्पत्य वणी येथे दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी ओमिनी वाहनाने जात होते. गोळ फाट्यानजिक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप (क्रं. एम. एच. १२-क्यू.जी. ९०५१ ) या वाहनाने जोरदार धडक दिली.
दरम्‍यान, धडक एवढी जोरदार होती की ओमिनीचा पुढील भाग पुन्हा पेठच्या दिशेला झाला. मात्र प्रसंगावधान राखत गोळशीफाटा परिसरातील नागरिकांनी जखमींना बाहेर काढले. मात्र काही वेळातच ओमिनीने पेट घेतला. दिंडोरी पोलिसांनी करंजाळी येथील प्राथमिक उपचार केंद्रात जखमींना दाखल केले आहे.

हे ही वाचा  

Back to top button