हरकतींच्या सुनावणीला या, पण वेळ निश्चित नाही ; नाशिक मनपा प्रशासनाचा अजब कारभार | पुढारी

हरकतींच्या सुनावणीला या, पण वेळ निश्चित नाही ; नाशिक मनपा प्रशासनाचा अजब कारभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबत प्राप्त झालेल्या हरकतींबाबत येत्या 23 फेब्रुवारीला नाशिक मनपाच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. मात्र, हरकतदारांना पाठविलेल्या पत्रात सुनावणीची वेळ निश्चितपणे कळविण्यात न आल्याने अनेकजण संभ्रमात सापडले आहेत.

प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. या कालावधीत महापालिकेत एकूण 211 इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यातही प्रभागांच्या हद्दीसंदर्भातीलच हरकतींचा सर्वाधिक प्रमाणात समावेश आहे. या हरकतींवर दि. 23 फेब—ुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली असून, सुनावणीपूर्वी प्रत्येक हरकतीच्या अनुषंगाने मनपाने नेमलेल्या पाच पथकांच्या माध्यमातून स्थळ पाहणी करून अहवाल तयार करण्यात आला आहे. सुनावणी एक दिवसावर येऊन ठेपल्याने मनपाच्या प्रशासन विभागाचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी हरकतदारांना पत्र पाठवून सुनावणीस आवश्यक त्या कागदपत्रांसह व पुराव्यासह वेळेवर उपस्थित राहण्याची सूचना केली आहे.

मात्र, मनपाने पाठविलेल्या पत्रात कालावधी सकाळ, दुपारी 7 ते 8 अशी देऊन दिलेल्या वेळेच्या पाच मिनिटे अगोदर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. परंतु, दिलेल्या वेळेत हरकतदारांनी सकाळी उपस्थित रहायचे की दुपारी याबाबत मात्र स्पष्टपणे कळविलेले नसल्याने संबंधितांमध्ये संभ—म निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पत्रात नमूद केल्याप्रमाणे वेळेचा कालावधी सकाळ/दुपारी 7 ते 8 असा दाखविण्यात आलेला आहे. काही हरकतदारांनी मनपाकडे स्पष्टता मागितली असता त्यांना सायंकाळी 7 वाजेची वेळ कळविल्याने संभ—मात भर पडली आहे.

सायंकाळची वेळ आली कुठून?
वेळेबाबत हरकतदार सचिन दप्तरे यांनी मनपाला पत्राव्दारे विचारणा केली असता त्यांना सायंकाळची वेळ सांगितली आहे. परंतु, मनपाने पाठविलेल्या पत्रात केवळ सकाळ, दुपारच्याच वेळेचा उल्लेख केलेला असताना सायंकाळची वेळ आली कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

Back to top button