नाशिक : तडीपार केलेले असतानाही शहरात वास्तव्य करणारा एकजण गजाआड | पुढारी

नाशिक : तडीपार केलेले असतानाही शहरात वास्तव्य करणारा एकजण गजाआड

नाशिक : शहर व जिल्ह्यातून चार महिन्यांसाठी तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्यास उपनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. नितीन निवृत्ती बनकर (२७, रा. रोकडोबावाडी) असे पकडलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. नितीन यास डिसेंबर २०२१ मध्ये चार महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र त्याने न्यायालयाची किंवा पोलिसांची पुर्वपरवानगी न घेता शहरात वास्तव्य केले. त्यास सोमवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास रोकडोबावाडी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button