धुळे : आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याने, सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल | पुढारी

धुळे : आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याने, सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

धुळे, पुढारी वृत्तसेवा : सोशल मिडीया व्हॉटसअ तसेच फेसबुकवर आक्षेपार्ह ऑडीओ क्लिप व्हायरल करण्याचा प्रकार भोवला आहे. धार्मिक एकात्मता धोक्यात आणू पाहणाऱ्या ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी असाच वेगळा गुन्हा दाखल झाला आहे. धुळे शहरात एका बॅनर वरील फोटो वर आक्षेप घेत पोलिसांनी हा बॅनर काढला. यावरून सोशल मीडियाचा वापर करीत धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

तर आज वेगळ्या मॅसेज प्रकरणात पोलिस कर्मचारी भूषण खेडवन यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ‘अल्मीन यासिन अन्सारी’ या व्हॉटसअॅप गृपवर एकाने आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल केली. या प्रकरणी ऑडीओ क्लिप व्हायरल करणारी व्यक्ती, दाेन गृप अॅडमिन, वसीम अक्रम, शब्बीर मन्यार, शाहबाज शेख व अन्य एक जण यांच्या विरोधात धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button