बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिमोगात संघर्ष उफाळला | पुढारी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिमोगात संघर्ष उफाळला

शिमोगा, पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील शिमोगा येथे रविवारी रात्री झालेली बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर संघर्ष उफाळला आहे. मुस्लीम गुंडांनी केल्याचा आरोप कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी केला. तसेच काँग्रेस कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी हिजाब निषेधार्थ टिप्पण्या करून ही हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही ईश्वराप्पा यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

पुन्हा एकदा नाशिक महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल : देंवेद्र फडणवीस

२६ वर्षीय हर्ष याची ४ ते ५ जणांनी रविवारी संध्याकाळी भोसकून हत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर शिमोगामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊन जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर येथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दोन दिवस शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तर मोठ्या सभांना बंदी घालण्यात आली आहे.

पुणे : यावर्षीचे बाजरीचे पीक उत्तम; श्री क्षेत्र वीर येथील यात्रेत भाकणूक

ईश्वरप्पा यांनी सांगितले की. हर्ष खूप चांगला आणि प्रामाणिक कार्यकर्ता होता. रविवारी रात्री मुस्लिम गुंडांनी त्याची हत्या केली. अलीकडेच डीके शिवकुमार यांनी दावा केला आहे की, राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावण्यात आला होता आणि सुमारे ५० लाख भगव्या शाल मागवण्यात आल्या होत्या. त्यांच्या या विधानानंतर गुंडगिरी वाढली आहे. आम्ही हा गुंडगिरी चालू देणार नाही. आम्ही हर्षच्या  कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू,

Aruna Irani : ”पती आधीच विवाहित होता माहित नव्हतं’

दरम्यान, जेव्हा वर्गात हिजाब बद्दल निषेध आणि प्रतिवाद झाला तेव्हा शिमोगा येथील महाविद्यालयात राष्ट्रध्वज खाली खेचला गेला आणि त्याच्या जागी भगवा ध्वज फडकवला गेला, असा आरोप करून ईश्वरप्पा यांना भाजपने बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी शिवकुमार यांनी केली आहे.

ओमायक्रॉन सब-व्हेरियंट बीए.१ ग्रस्तांना बीए.२ ची लागण अशक्य

Back to top button