धुळ्याच्या जात पडताळणी विभागाच्या लाचखोर लिपिकास बेड्या | पुढारी

धुळ्याच्या जात पडताळणी विभागाच्या लाचखोर लिपिकास बेड्या

धुळे पुढारी वृत्तसेवा : जात प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्यासाठी जात पडताळणी समितीच्या कनिष्ठ लिपिकास 45 हजार रुपयांची लाच घेताना धुळ्याच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात तक्रार देणाऱ्या युवकाने धुळ्याचे जात पडताळणी समिती समोर जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केला होता. यात जात प्रमाणपत्राची मूळ प्रत देखील देण्यात आली होती. तक्रारदार यांना 2017 मध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र पडताळणी नंतर त्यांना मूळ प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यांनी दुय्यम परत मिळावी यासाठी कार्यालयात संपर्क केला. यावेळी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विजय रतन वाघ यांना त्यांनी ही दुय्यम प्रत देण्याची विनंती केली. यावेळी वाघ यांनी तक्रारदाराकडून पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर यांना संपर्क करून ही माहिती दिली.

त्यानुसार बडगुजर यांनी पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे व मंजितसिंग चव्हाण तसेच कैलास जोहरे, शरद काटके, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर, सुधीर मोरे आदींना या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान दोन पंचांसमक्ष तक्रारदाराला पुन्हा कार्यालयात पाठवले असतात विजय वाघ यांनी तडजोडी अंती पंचेचाळीस हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ही रक्कम धुळे शहरातील पांझरा नदीच्या काठावर असलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिर समोरील रस्त्यावर देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार हे या ठिकाणी पोहोचले. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या ठिकाणी सापळा लावलेला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी वाघ यांना पैसे देताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button