धुळे : मापात पाप करून ४० लाखांची फसवणूक,चौघांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

धुळे : मापात पाप करून ४० लाखांची फसवणूक,चौघांविरोधात गुन्हा दाखल

धुळे; पुढारी वृत्तसेवा: सोयाबीनचे वजन करताना मापात पाप करून कंपनीला ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या चौघांविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या डीसान ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये २०१८ ते २०२० या दरम्यान हा प्रकार घडला आहे. या कंपनीच्या वजन काट्यावर धुळे येथे राहणारे कुणाल ज्ञानेश्वर सपकाळ आणि केशव चंद्रसिंग पाटील हे नेमणुकीस होते.

या कालावधीत त्यांनी कंपनीच्या वजन काट्यावर मालाचे वजन करण्याचे सोपवलेले हाेते.  कंपनीत येणाऱ्या सोयाबीन विक्रीसाठी आणणारे व्यापारी दिलीप काळुसिंग निमरोट आणि ज्योतीसिंग काळूसिंग निमरोट या दोघांबरोबर त्‍यांनी संगनमत केले. आर्थिक फायद्यासाठी यांच्याकडून येणाऱ्या ९ वाहनांमधून सोयाबीनच्या १८० फेऱ्यांमध्ये वजन मापात फेरफार केला. काही वेळा चार तर काही वेळा पाच टन मालाचे जास्त वजन पावतीवर नोंदवून कंपनीची फसवणूक केली

. या कालावधीच्या दरम्यान एक हजार टन वजनाचे खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आले. यातून ४० लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार अशोक मुकुंदा सोनार यांनी  दिली. चौघांविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button