नंदुरबार : ट्रक्टरमधून सुरु होती अवैध दारूची वाहतूक ; एकाला बेड्या,16 लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नंदुरबार : ट्रक्टरमधून सुरु होती अवैध दारूची वाहतूक ; एकाला बेड्या,16 लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा :  स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आणि शहादा पोलिसांनी सापळा रचून  शहादा तालुक्यातील पिंपर्डे गावाजवळ  आज 14 फेब्रुवारी पहाटेच्या दरम्यान एका ट्रॅक्टर मधून नेला जाणारा सुमारे नऊ लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त केला. ट्रॅक्टरसह जप्त मुद्दे मालाची किंमत 17 लाख रुपये इतकी आहे.

महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 65 (ई), 108 प्रमाणे फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास हिम्मत कापुरे यांच्या फिर्यादीवरून लखन उर्फ गणेश दला भिल, वय- 28 वर्षे, रा. वाडी बुद्रुक, ता. शिरपुर जि.धुळे यास अटक करण्यात आली आहे.

आज सोमवार दि. 14 रोजी पहाटेच्या सुमारास पिंपर्डे गावच्या 500 मीटर पुढे रस्त्याच्या कडेला बॉम्बे व्हिस्कीचे एकुण 110 खोके जप्त करण्यात आले. या प्रत्येक खोक्यात 180 मि.ली. च्या 48 प्लास्टिकच्या बाटल्या अशा एकुण 5280 बाटल्या प्रत्येकी एका बाटलीची किंमत 130 रुपये प्रमाणे 6 लाख 86, हजार 400 रुपये किमतीचा साठा. त्याचबरोबर किंगफिशर स्ट्राँग बिअर नावाचे एकुण 39 कागदी पृष्ठाचे खोके त्यात प्रत्येक खोक्यात 500 मिलीचे 24 टीन असे एकुण 936 टीन एका टीनची किमंत 180/- रुपये प्रमाणे 1 लाख 68 हजार 480 /- रु. चा साठा, 55,200 /-रु.कि.चे. माऊन्टस 6000 सुपर स्ट्राँग बिअर यासोबतच 7 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर त्याच्या पुढील दर्शनी भागावर पाठीमागील ट्रॉली असा 16 लाख 10 हजार 80/-रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास परिपोसई जितेंद्र महाजन हे करीत आहेत.

हेही वाचा ;

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button