Isro launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केले EOS-04 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण | पुढारी

Isro launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केले EOS-04 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

पुढारी ऑनलाईन डेस्क :   भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) EOS-04 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करत अंतराळ संशोधनात आणखी एक महत्वाची कामगिरी बजावली आहे.  इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C52 द्वारे EOS-04 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण (Isro launch) केले. यासोबत आणखी दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्‍यात आले.

हा उपग्रह काय करेल?
PSLV-C52 च्या माध्यमातून पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेला EOS-04 हा उपग्रह पृथ्वीवर लक्ष ठेवण्याचे काम करेल. तसेच कृषी, वृक्षारोपण, जमिनीतील ओलावा, पुराचे नकाशे, जलविज्ञान आणि हवामानविषयक माहिती देण्याचे कामही हा उपग्रह (Isro launch) करणार आहे.

दोन छोटे ध्रुवीय उपग्रह?                                                                                                                          याशिवाय दोन ध्रुवीय उपग्रहही अवकाशात (Isro launch) पाठवण्यात आले आहेत. एक कोलोरॅडो विद्यापीठाच्या सहकार्याने याशिवाय दुसरा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अँड टेक्नॉलॉजी येथे तयार करण्यात आला आहे. एका उपग्रहांद्वारे आयनोस्फियर आणि सूर्याच्या कोरोनल थर्मल प्रक्रियेबद्दल संशोधन केले जाईल, तसेच दुसऱ्या उपग्रहाद्वारे जमिनीचे तापमान, आर्द्रता आदींचा शोध घेतला जाणार आहे.

मानवी हृदयातील पेशीपासून बनविले मासे!

PSLV द्वारे करण्यात येणारे हे ५४ वे उड्डाण असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सांगितले. तसेच 6 PSOS-XL (Strapon Motors) द्वारे प्रणाली वापरणारी ही 23वी मोहीम आहे. PSLV ने (Isro launch) पाठवलेला हा उपग्रह पृथ्वीपासून ५२९ किमी उंचीवर स्थापित करण्यात आला आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button