नाशिक : विहिरीत तरंगत होता विवाहितेचा मृतदेह, परिसरात खळबळ | पुढारी

नाशिक : विहिरीत तरंगत होता विवाहितेचा मृतदेह, परिसरात खळबळ

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथे हर्षदा सुयोग काळे (२०) या विवाहितेचा मृतदेह घोडे वस्तीजवळच्या विहिरीत तरंगताना आढळला. पिंपळगाव पोलिसपाटील भरत फड यांनी याबाबतची खबर लासलगाव पोलिस कार्यालयाला दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १०) सायंकाळी शरद गंगाधर घोडे यांच्या शेतातील विहिरीत हर्षदा सुयोग काळे यांचा मृतदेह तरंगताना आढळला. या घटनेची माहिती समजताच सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, प्रदीप आजगे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button