नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अस्त सुरु झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या २४ तासात देशात ४४ हजार ८७७ रुग्णांची नोंद झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट आता ३.१७ टक्के झाला आहे. देशात आजघडीला ५ लाख ३७ हजार ४५ केसेस ॲक्टीव्ह केसेस आहेत.
गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार ५९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेतंर्गत आतापर्यंत १७२.८१ कोटी डोस देण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता खबरदारी म्हणून आतापर्यंत १.६८ कोटी बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना लावण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १७० कोटी ४१ लाख ९२ हजार ३५० डोस पैकी १२ कोटी २७ लाख ९३ हजार २८१ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
देशात आतापर्यंत ७४ कोटी ९३ लाख २० हजार ५७९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १४ लाख ५० लाख ५३२ कोरोना तपासण्या शुक्रवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचलं का ?