जळगाव : मनपाची मोठी कारवाई ; भोईटे मार्केट केले सील | पुढारी

जळगाव : मनपाची मोठी कारवाई ; भोईटे मार्केट केले सील

जळगाव पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलनातील थकबाकीदारकांचे गाळे सील करण्याची कारवाई पुन्हा हाती घेण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत भोईटे मार्केट मधील सर्वच्या सर्व २४ गाळे मनपा प्रशासनाने सील केले आहेत. या कारवाईमुळे थकबाकीदार गाळेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भोईटे मार्केट मधील सर्वच गाळे सील करण्यात आले आहेत. ही कारवाई  महसूल उपायुक्त प्रशांत पाटील, अतिक्रमण विभाग उपायुक्त श्याम गोसावी, किरकोळ वसुली अधीक्षक नरेंद्र चौधरी, संजय ठाकूर, गौरव सपकाळे, सुकदेव बाविस्कर, संजय दाभाडे, राजू शिंदे, किशोर सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. गाळे सील करण्याची कारवाई काल दि.11 दुपारी १२ वाजता सुरु करण्यात आली. वेळोवेळी थकबाकी भरण्यासंदर्भात आवाहन करून देखील भोईटे मार्केट मधील गाळेधारकांनी ती न भरल्याने संपूर्ण मार्केटच सील करण्यात आले आहे.

भोईटे मार्केट मधील गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. एकही गाळेधारकांने ही थकबाकी अंतिम मुदतीपर्यंत न भरल्याने मार्केट सील करण्यात आले आहे. जवळपास २.५ कोटींची थकबाकी या गाळेधारकांकडे थकीत होती. संपूर्ण मार्केट सील करण्याची कारवाई महापालिकेकडून प्रथमच करण्यात आली असल्याने गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button