नाशिक : खैर लाकडाची तस्करी रोखली ; एकाला अटक, वनविभागाची कारवाई | पुढारी

नाशिक : खैर लाकडाची तस्करी रोखली ; एकाला अटक, वनविभागाची कारवाई

पेठ : पुढारी वृत्तसेवा पेठ-नाशिक महामार्गावरील वांगणी शिवारात रात्रीच्या सुमारास पाच लाख रुपये किमतीच्या खैर लाकडाची तस्करी करणार्‍या वाहनांसह एकाला वनविभागाने अटक केली.

बुधवारी (दि. 2) रात्री 12.30च्या सुमारास गस्तीवर असणार्‍या वनविभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, संशयास्पद वाहन (क्र. एमएच 04 ,जेके 6262) अडवून तपाासणी केली असता, वाहनात सुमारे 437 खैराचे लाकडी नग आढळले. चालकाकडे अधिक तपास करता, या सर्व मालाची अवैधरीत्या वाहतूक मोवा (सुरत) येथून पुण्याला केली जात असल्याचे उघड झाले. चालक मन्नूू अली शेख याला अटक करीत 20 लाखांचे वाहन व पाच लाख रुपयांचे खैर वनविभागाने ताब्यात घेतले.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button