तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच ; डीएनए अहवाल प्राप्त | पुढारी

तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच ; डीएनए अहवाल प्राप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; वाडिवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. डीएनए चाचणीवरून हा मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डाॅ. वाजे यांच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रादेशिक परिवहन विभागाने वाडिवऱ्हे पोलिसांकडे गोपनिय अहवाल दिला असून त्यात जळालेल्या कारची सर्व माहिती, कारला आग कशी लागली याबाबतची माहिती असल्याचे सुत्रांनी सांगितले.

वाडिवऱ्हे परिसरात मागील आठवड्यात कारमध्ये पुर्ण जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा मृतदेह गोविंदनगर येथील रहिवासी डॉ. सुवर्णा संदीप वाजे (४०) यांचा असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली होती. डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या सिडकोतील मोरवाडी रुग्णालयात कार्यरत होत्या. मंगळवारी (दि.२५) सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या परंतु सायंकाळी सहा वाजून गेल्यानंतरही त्या घरी आल्या नव्हत्या.

त्यामुळे अंबड पोलिस ठाण्यात त्यांच्या पतीने डाॅ. वाजे बेपत्ता असल्याची तक्रार केली. त्यानंतर मध्यरात्री त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, डॉ. वाजे यांचा मृत्यू घातपातामुळे झाला की अपघातामुळे हे गुढ उकलवण्याचे आव्हान ग्रामीण पाेलिसांसमोर आहे. प्रादेशिक परिवहन विभागानेही जळालेल्या वाहनाची माहिती आगीचे कारण वाडिवऱ्हे पोलिसांकडे सोपवल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे डॉ. वाजे यांच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात लवकरच यश मिळेल असा विश्वास ग्रामीण पोलिस वर्तवत आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button