जळगावात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्यांवर छापा ; तीन अटकेत | पुढारी

जळगावात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्यांवर छापा ; तीन अटकेत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; शहरातील जळगाव- औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या अमरनाथ हॉटेलात वेश्या व्यवसाय चालवित असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी तीन जणांना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव औरंगाबाद महामार्गावर असलेल्या अमरनाथ हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, आशा पांचाळ, सुनिल पाटील, किरण धमके, चंद्रकांत चिकटे, संतोष जाधव, रविंद्र सुरळकर, रविंद्र कारंकाळ, मिलींद पाटील यांनी सोमवारी दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमरनाथ हॉटेलमध्ये छापा टाकला.

या कारवाईत राजेश मिठाराम ठोंबरे (वय-४९) रा. जुना खेडी रोड, जळगाव, विकास रमेश सोनवणे (वय-२७) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्यासह दोन महिलांसोबत आढळून आले. याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक निलेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शंकर दुलाराम महाजन वय ४१ रा. हनुमान नगर, जळगाव, ग्राहक राजेश मिठाराम ठोंबरे आणि विकास रमेश सोनवणे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे करीत आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button