नाशिक : क्रेनच्या डोंगराच्या कपारीला धडकली; एक जण जागीच ठार | पुढारी

नाशिक : क्रेनच्या डोंगराच्या कपारीला धडकली; एक जण जागीच ठार

चिकोडी, पुढारी वृत्तसेवा : समोरील येणारे वाहन चुकवण्याच्या प्रयत्नात क्रेन डोंगराच्या कपारीत जाऊन धडकली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर सहा जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील करोशी येथे सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली. सत्यप्पा कलाप्पा खद्दी ( वय २७, रा. जोडकुरळी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, करोशी येथील सात  तरुण क्रेनने चिकोडीकडे जात होते. यावेळी सदर क्रेनने घट्टगी बसवना मंदिरा जवळच्या घाटातुन जाताना समोरून येणाऱ्या गाडीला चुकविण्याच्या प्रयत्नात क्रेनवरिल नियंत्रण गमावले. त्यामळे क्रेन शेजारी असलेल्या डोंगराच्या कपरीला धडकली. यात सत्यप्पा कलाप्पा खद्दी ( वय 27) रा जोडकुरळी हा जागीच ठार झाला. तर चालक विकास पवार व विजय निकम (रा.करोशी व राजेसाब सदलगे रा शिरगाव ) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य तिघांना  किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सीपीआय आर आर पाटील , ट्राफिक पीएसआय ए टी अमिनभावी भेट देऊन पंचनामा केले.

हेही वाचा.

Back to top button