रायगड : सुतळी बॉम्बसह PFI जिंदाबादचे स्टिकर लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल | पुढारी

रायगड : सुतळी बॉम्बसह PFI जिंदाबादचे स्टिकर लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

पनवेल विक्रम बाबर : नवीन पनवेल सेक्टर १९ मधील निल आंगण सोसायटीच्या दर्शीनीय भागाला तसेच, सोसायटीमधील रहिवाशाच्या घरा बाहेर  ” PFI ” Zindabad” चे स्टिकर तसेच दोन सुतळी बॉम्ब आणि एक विझलेली अगरबत्ती ठेवून नवीन पनवेल शहरात दहशत माजवणाची घटना घडली. या प्रकरणातील अज्ञात व्यक्तीवरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा शोध खांदेश्वर पोलीस घेत आहे.

नवीन पनवेल सेक्टर १९ प्लॉट नंबर २९ शिवा कॉम्प्लेक्सच्या शेजारी असणाऱ्या निल आंगण सोसायटीमध्ये शुक्रवारी उशिरा रात्री हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सोसायटी मधील एका रहिवाशाला  शुक्रवारी (दि. २३) संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या आवारात ‘PFI’ Zindabad चे स्टिकर दिसून आले. त्यानंतर या रहिवाशाला सोसायटीच्या प्रत्येक माळ्यावरील घराच्या बाहेर, ‘PFI’ Zindabad  चे स्टिकर दिसून आले. तसेच ७८६ नंबर देखील दिसून आला. तसेच रूम नंबर २०२ च्या समोरील कठड्यावर एका सफेद रंगाचा कागद दिसून आला. या कागदात हिरव्या रंगाचे दोन सुतळी फटाके, एक अगरबत्ती (विझलेली), सेलो टेपने चिटकवलेली दिसून आली, त्यानुसार या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर, खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेत,अज्ञात व्यक्तीवर  गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला आहे.

Back to top button