Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : वडाळागाव येथे कारवाई करत पोलिसांनी ५ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद साजीद मोहम्मद नासीर अन्सारी (२५, रा. सादिकनगर, वडाळागाव) हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून पान मसालाचा माल घेऊन जाताना आढळून आला.

तर माेहम्मद दिलशाद इस्लाममुद्दिन मलिक (३१) व मोहम्मद जुबेर रियासदअली अन्सारी (२०) यांच्या साठेनगर येथील घरी छापा मारून विक्रीसाठी साठविलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू मिळून आली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button