नाशिकमधील रस्ता दुरवस्थेची दिल्लीच्या पथकाकडून पाहणी | पुढारी

नाशिकमधील रस्ता दुरवस्थेची दिल्लीच्या पथकाकडून पाहणी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा मुख्य रस्ता बनविण्यासाठी दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम अभियंता पथकाने नुकतीच पाहणी केली.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जागृत नागरिक कृती समितीच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या आमरण उपोषणाला इगतपुरीतील विविध स्तरांतून पाठिंबा मिळाला होता. त्याची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, ज्येष्ठ नेते महेश हिरे आदी नेत्यांनी बांधकाम विभागास त्वरित रस्त्याची पाहणी करून काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील भारत सरकारचे शास्त्रज्ञ राकेशकुमार, कार्यकारी अभियंता उदय पालवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सल्लागार लांबे, उपअभियंता नितीन घोडके, कनिष्ठ अभियंता सीमा जाधव यांनी मंगळवारी (दि.25) इगतपुरीच्या मुख्य रस्त्याची पाहणी केली. लवकरात लवकर या रस्त्याचे काम मार्गी लागेल, अशी ग्वाही दिली. यावेळी रमेशसिंह परदेशी, कैलास विश्वकर्मा, ताराचंद भरंडीवाल, गजानन गोफणे, घनश्याम रावत, रामचंद्र नायर, विजय गोडे, नीलेश चांदवडकर, सतीश मोरवाल, शैलेश पुरोहित, जाहिद खान आदी उपस्थित होते. प्रदेश भाजप प्रवक्ते प्रवीण अलई, जिल्हा भाजप महासचिव प्रा. सुनील बच्छाव, भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील, पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, मुख्याधिकारी पंकज गोसावी आदींचे सहकार्य लाभले.

गेल्या सात वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत तीन नागरिकांचा बळी गेला आहे. मात्र, तरीही प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे आम्हाला भर उन्हाळ्यात पोषण करावे लागले. – अजित पारख, सामाजिक कार्यकर्ते.

हेही वाचा:

Back to top button