नाशिकमध्ये आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट लागला कामाला, समिती गठीत | पुढारी

नाशिकमध्ये आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट लागला कामाला, समिती गठीत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागला आहे. महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे तसेच जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी शिंदे गटाकडून खास समिती गठीत करण्यात येत आहे.

बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा 8 सदस्यीय समिती करण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या रणनितीसोबतच पक्षाची संघटनात्मक बांधणी, संघटनात्मक निर्णय, विविध आंदोलने जनजागृती आणि शिंदे सरकारने घेतलेले विविध निर्णय हे सर्वसामन्य जनतेपर्यंत पोहचवणे, तसेच संघटनेतील कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने ही समिती कामकाज करेल अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

समिती सदस्य-

भाऊसाहेब चौधरी- सचिव

दादा भुसे-पालकमंत्री

हेंमत गोडसे-खासदार

सुहास कांदे -आमदार

अजय बोरस्ते-जिल्हाप्रमुख

प्रविण तिदमे-महानगरप्रमुख

संपर्क प्रमुख

राजु आण्णा लवटे- नाशिक लोकसभा, सहसंपर्क प्रमुख

हेही वाचा : 

 

Back to top button