Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ३२८ अंकांनी वाढून बंद, निफ्टी २२,२०० वर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी (दि.१४) सलग तिसऱ्या सत्रात तेजीत बंद झाले. बाजारात सर्वाधिक तेजी ऑटो, मेटल आणि एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्ये राहिली. सेन्सेक्स आजच्या ट्रेडिंग सत्रात ५०० अंकांनी वाढला. त्यानंतर तो ३२८ अंकांच्या वाढीसह ७३,१०४ वर स्थिरावला. तर निफ्टी ११३ अंकांनी वाढून २२,२१७ वर बंद झाला.

लोकसभा निवडणुकीदरम्यान गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती. एकूणच गुंतवणूकदारांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली होती. पण गेल्या तीन सत्रांत बाजार घसरणीतून सावरला.

बाजारातील ठळक घडामोडी

  • बाजारात सलग सत्रांत तेजीचा माहौल
  • सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स सर्वाधिक ३.७६ टक्क्यांनी वाढला
  • टीसीएसचा शेअर्स १.१४ टक्क्यांनी घसरला
  • बीएसई मिडकॅप १.१ टक्क्यांनी वाढून बंद
  • निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स ५.४० टक्क्यांनी वाढला
  • सिप्लाचा शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी घसरला
  • क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी मेटल टॉप गेनर
  • क्षेत्रीय निर्देशांकात टॉप गेनर कोण?

बीएसई मिडकॅप १.१ टक्के आणि स्मॉलकॅप १.७ टक्क्यांनी वाढला. क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी मेटल टॉप गेनर राहिला. हा निर्देशांक २.७७ टक्क्यांनी वाढला. त्यानंतर निफ्टी ऑटो आणि ऑइल अँड गॅस प्रत्येकी १.८ टक्क्यांनी वाढले. निफ्टी पीएसयू बँक, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि रियल्टी प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. निफ्टी एफएमसीजी आणि फार्मा प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. आजच्या सत्रात १३ पैकी ९ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली.

सेन्सेक्सवर काय स्थिती?

सेन्सक्सवर एम अँड एम, एलटी, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, इंडसइंड बँक, सन फार्मा, एसबीआय, रिलायन्स, मारुती, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, विप्रो हे शेअर्स वाढले. तर टीसीएस, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये घसरण झाली.

sensex closing
sensex closing

निफ्टीवर कोणते शेअर्स तेजीत?

निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेस, एम अँड एम, हिरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, एलटी हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांदरम्यान वाढले. तर सिप्ला, टीसीएस, टाटा कन्झ्यूमर, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले.

Nifty 50
Nifty 50

श्रीराम फायनान्सचा शेअर्स तेजीत, कारण काय?

श्रीराम फायनान्सचा शेअर्स (Shriram Finance Share Price) बीएसईवर ५ टक्क्यांनी वाढून २,४१९ रुपयांवर पोहोचला. दरम्यान, दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स २,३२९ रुपयांवर आला. एनबीएफसी फर्मच्या बोर्डाने हाऊसिंग फायनान्स युनिट – श्रीराम हाऊसिंग फायनान्स (SHFL) यूएस प्रायव्हेट इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकसला ४,६३० कोटी रुपयांना विकण्यास मान्यता दिल्यानंतर श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news