Gold Bill in 1959 : ६० वर्षांपूर्वी १ लिटर पेट्रोलच्या किमतीत मिळत होते, १ तोळा सोने | पुढारी

Gold Bill in 1959 : ६० वर्षांपूर्वी १ लिटर पेट्रोलच्या किमतीत मिळत होते, १ तोळा सोने

पुढारी ऑनलाईन: आजकाल महागाई इतक्या झपाट्याने वाढत आहे की, वस्तूंच्या किमती कधी आणि किती वाढतील याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. सध्या सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या दिसतात. सोने खरेदी करणे म्हणजे सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेरची गोष्ट बनली आहे. यातच लोकांना आवाक करणारे सोने खरेदीचे बिल व्हायरल होत आहे. या १९५९ च्या बिलावर(Gold Bill in 1959) १ तोळा म्हणजे १० ग्रॅम सोने हे सध्याच्या १ लीटर पेट्रोलच्या किमतीत मिळत असल्याचा दर पाहायला मिळत आहे.

समाजात अगदी खालच्या स्तरातील लोकांना दोन वेळची भाकरी मिळणेही काठीण झाले आहे, अशा परिस्थितीत सोशल मीडियावर अनेक प्रकरची जुनी बिले व्हायरल (Gold Bill in 1959) होत आहेत. ज्यामध्ये बुलेटचे बिल, सायकल बिल, डोसाचे बिल व्हायरल झाले होते. जे पाहून लोकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर डोसाचे बिल व्हायरल झाले होते. ज्यामध्ये डोशाची किंमत केवळ एक रूपया होती. तर आता ६४ वर्षापूर्वीचे सोने खरेदी बिल (Gold Bill in 1959) व्हायरल होत आहे. ३ मार्च १९५९ च्या या बिलावर वामन निंबाजी अष्टेकर असे सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानाचे नाव आहे. तसेच यावर रविवार पेठ, पुणे असा पत्ता आहे. यामध्ये ग्राहकाने सोने आणि चांदीच्या वस्तू खरेदी केलेत. ज्याची पूर्ण किंमत ही ९०९ रूपयांचे बिल आहे.

हे बिल खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी यावर त्यावेळी ११३ रूपये तोळा सोने मिळत आहे तर आता १ तोळा सोन्याची किंमत ही ५0 हजारांहून अधिक आहे, असे म्हटले आहे. नेटकरी यावर भरभरून कमेंट करत आहेत. तुम्हालाही या व्हायरल फोटोवर काय वाटते ते नक्की सांगा.

हेही वाचा:

Back to top button