नाशिक : सावाना बालनाट्य स्पर्धेत अद्भूत बाग प्रथम | पुढारी

नाशिक : सावाना बालनाट्य स्पर्धेत अद्भूत बाग प्रथम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक वाचनालय बालभवन साने गुरुजी कथामाला आयोजित कै. रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेत एस्पॅलियर शाळेच्या अद्भूत बाग या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. सुजित जोशी यांनी लिखित व दिग्दर्शित या नाटकात मोबाइल, ऑनलाइन शिक्षण यामुळे येणारा शारीरिक, मानसिक त्रास यातून बाहेर पडा आणि मैदानी खेळ खेळण्याचा संदेश देण्यात आला.

मु. शं. औरंगाबादकर सभागृहामध्ये आयोजित बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता अजय तापकिरे, संतोष गुजराथी, डॉ. विलास गुजराथी, सावाना उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, डॉ. धर्माजी बोडके, ॲड. अभिजित बगदे, संजय करंजकर, देवदत्त जोशी, प्रा. सोमनाथ मुठाळ, मंगेश मालपाठक, गणेश बर्वे उपस्थित होते. तापकीरे म्हणाले, अभिनयाच्या क्षेत्रात पहिली पायरी बालरंगभूमी असते. स्पर्धेतूनच जीवनात यशस्वी होता येते, असे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कथा मुलांना सांगितली. वैद्य विक्रांत जाधव यांनी, येत्या काळात वाचनालयातर्फे बालनाट्य कार्यशाळा घेतली जाईल, असे जाहीर केले. परीक्षक म्हणून सुभाष पाटील, श्रीराम वाघमारे, पल्लवी ओढेकर यांनी काम पाहिले. प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी प्रास्ताविक, गीता बागूल यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बर्वे यांनी आभार मानले.

बालनाट्य स्पर्धेतील विजेते नाटक
प्रथम : अद्भूत बाग (इस्प्लियर स्कूल)
द्वितीय : रिले (रचना विद्यालय)
तृतीय : आम्हाला पण शाळा पाहिजे (संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर, सिन्नर)
उत्तेजनार्थ : दुधावरची साय (र. ज. चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल)
उत्तेजनार्थ : माझे गीता रहस्य (दीपक मंडळ)
उत्तेजनार्थ : गृहपाठाला सुट्टी (मोहिनी देवी रुंगटा हायस्कूल)
ग्रामीण नाटक : मिशन मास्तर (महात्मा गांधी हायस्कूल, इगतपुरी)
विशेष परीक्षक पसंती नाटक : खरंच मोबाइल आहे का इतका गरजेचा? (रवींद्र मंडळ संचलित प्राथमिक शाळा, बागवानपुरा)

सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
प्रथम : क्षितिजा भावसार (रिले)
द्वितीय : वीर दीक्षित (अद्भूत बाग)
तृतीय : लावण्या पवार (मिशन मास्तर)
उत्तेजनार्थ : आरोही ठोके (आम्हाला पण शाळा पाहिजे)
उत्तेजनार्थ : पूर्वी पारख (माझे गीता रहस्य)

हेही वाचा:

Back to top button