मालेगावी बीफ कारखान्याच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा | पुढारी

मालेगावी बीफ कारखान्याच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

मालेगाव मध्य : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा

मुंबई- आग्रा महामार्गालगत शहरातील पवारवाडी भागात असलेल्या अल फैज या बीफ कंपनीच्या कार्यालयावर मुंबई व पुणे येथील आयकर विभागाने काल मंगळवारी (दि.17) छापा टाकला. कंपनीच्या आर्थिक उलाढालीच्या संशयावरून छापा टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशासह परदेशात बीफ निर्यात करणार्‍या अल फैज या कंपनीच्या कार्यालयावर काल दुपारी 12 वाजेपासून अधिकार्‍यांकडून तपासणी सुरू आहे. दरम्यान पथकाने शहरातून एका चार्टर्ड अकाउंटंटला चौकशीकामी ताब्यात घेतले असून या छाप्यात अधिकार्‍यांच्या हाती काही लागले की नाही याचा तपशील अद्याप मिळू शकला नाही. दरम्यान कारवाई होताच कारखान्यात सुरू असलेले काम थांबविण्यात येवून कारखान्यातील सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आल्यानंतर कारखान्याचा मुख्य दरवाजा बंद करुन कारवाई सुरू करण्यात आली आहे. पथकाने वरळी रोडवरील हाडे व चामडे ठेवलेल्या गोदामाची देखील पाहणी केल्याचे समजते.

हेही वाचा :

Back to top button