नाशिक पदवीधर निवडणूक अर्जासाठी आज अखेरचा दिवस | पुढारी

नाशिक पदवीधर निवडणूक अर्जासाठी आज अखेरचा दिवस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.11) सात उमेदवारांनी दहा नामनिर्देशन अर्ज सादर केले असून, आतापर्यंत 13 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ तथा उपआयुक्त (सा. प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.

आज (दि. १२) निवडणूक अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. या निवडणुकीसाठी ५ जानेवारी रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. अर्ज दाखल करायची अंतिम मुदत १२ जानेवारी आहे. दाखल अर्जांची छाननी १३ जानेवारीला होणार आहे. माघारीसाठी १६ जानेवारी अंतिम मुदत आहे, तर ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

बुधवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये सुरेश पवार (नाशिक) यांनी अपक्ष व नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी या दोन पक्षांतून अर्ज सादर केले आहे. अन्सारी रईस अहमद अब्दुल कादिर (धुळे) व सुभाष चिंधे (अहमदनगर) यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. रतन बनसोडे (नाशिक) यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षातून, तर शुभांगी पाटील यांनी धुळे भारतीय जनता पक्षातून अर्ज सादर केला आहे. ईश्वर पाटील (धुळे) यांनी अपक्ष व आम आदमी पार्टी या पक्षातून दोन अर्ज सादर केले आहेत. सुभाष जंगले (श्रीरामपूर) यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.

हेही वाचा :

Back to top button