Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  घाटकोपरमध्ये मोठमोठे होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचा संचालक भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी आज (दि. १६) केली. त्याला उदयपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला लवकरच मुंबई आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई ठाणे परिसरात सोमवारी (दि.१३) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यादरम्यान  घाटकोपरमध्ये वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला तर ७५ जण जखमी झाले. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जाहिरात एजन्सी या परिसरात होर्डिंग्ज लावण्यासाठी जबाबदार होती. या कंपनीचा भावेश भिडे हा संचालक असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला आज अटक करण्यात आली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news