Yearly Horoscope 2023 : मीन : साडेसातीत गुरूकृपा | पुढारी

Yearly Horoscope 2023 : मीन : साडेसातीत गुरूकृपा

  • होराभूषण : रघुवीर खटावकर

मीन रास :  मीन रास ही रास जल तत्त्वाची आहे. या राशीत पूर्वा भाद्रपद नक्षत्राचे ४ थे चरण उत्तरा भाद्रपद नक्षत्र, रेवती नक्षत्र अशी अनुक्रमे अग्नी, जल तत्त्वाची नक्षत्रे आहेत.

मीन राशीत शुक्र हा ग्रह जल तत्त्वाचा व स्त्री ग्रह आहेत. मीन राशीत रेवती हे देवगणी नक्षत्र आहे. त्यात शुक्र हा उच्च फल देतो.
मीन राशीस्वीमी गुरू आहे. नेपच्यूनला सुद्धा मीन राशीचे स्वामित्व दिलेले आहे. या राशीच्या व्यक्ती अधिक संवेदनशील असतात. प्रेमळ असतात. या राशीवर गुरूकृपा जास्त असते. कारण ही मोक्ष त्रिकोणातील महत्त्वाची रास आहे. या राशी कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवत असतात. मीन राशीचे पुरुष किचनमध्ये बायकोच्या भोवती फिरण्यात आनंद मानतात.

या वर्षात दि. २१ एप्रिल २०२२ पर्यंत गुरू मीन या स्वतःच्या राशीत राहील. परदेशगमनाची संधी लाभेल. एखादी नवीन आजार उमटेल. स्वजनांपासून दूर जाल. महत्त्वाकांक्षी, आनंदी, आशावादी रहाल. दि. २१ एप्रिल २०२३ नंतर गुरू मेष राशीत प्रवेश कराल. तो मीन राशीसाठी रौप्य पादाने येत असून शुभ फले देणारा आहे. मीन राशीला २ रा आलेला गुरू व राशीस्वामी आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विवाह होईल. संतती होईल. कुटुंबवृद्धी होईल. रोजगार मिळेल. नवीन दर्जा मिळेल. स्थावर इस्टेटीत वाढ होईल. सांपत्तीक उन्नती होईल. कर्जमुक्ती होईल.

या वर्षात नेपच्यून दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी मीन राशीत प्रवेश करील. तो मीन राशीसाठी सुवर्णपाने येत असल्यामुळे चिंता निर्माण करेल. मीन राशीच्या व्यक्तींना जास्त संवेदनशील बनवेल. त्यांना अबोल बनवेल. त्यांच्या स्वभावाचा अंदाज येणार नाही. या वर्षात शनी दि. १७ जाने २०२३ रोजी कुंभ राशीत प्रवेश करील. तो मीन राशीसाठी रौप्य पादाने येत असून शुभ फले देण्याची हमी साडेसातीतही देत आहे. हा शनी धन हानी करेल. शत्रू वाढतील. विकास कामात भाग्यात अडचणी येतील. प्रत्येक कामात विलंब, अडचणी त्रास अनुभवाल. मोठ्या प्रमाणात खर्च होत राहील. मेष राशीत गुरू बरोबर हर्षल व राहू असणार आहेत. कौटुंबिक खर्च हाताबाहेर जाईल. अचानक खर्चाचे विषय समोर येतील. कुटुंबात अशांतता अनुभवाल.

अष्टमातील केतूमुळे शारीरिक व्याधी जाणवेल. प्लुटो मीन राशीच्या लाभ स्थानात असल्यामुळे मोठ्या कामातून आर्थिक प्राप्ती होईल, पण तुम्ही मोठ्या षड्यंत्राचा एक भाग बनू नका. मीन राशीसाठी रवी ३ रा वृषभेत (मे जून), ६ वा सिंहेत (ऑगस्ट-सप्टेंबर), १० वा ११ वा धनू मकरेत (डिसेंबर-जानेवारी, २३ जानेवारी-फेब्रुवारी) असताना सर्व कामात यश मिळते व उत्तम फळे मिळतात. या काळात मीन राशी व्यक्ती विकासासाठी नवीन उपाययोजना करतील. एखादी संधी कमी श्रमात चालून येईल. कार्यसिद्धी होऊन मोबदला मिळेल.

मीन राशीसाठी रवी ४ था मिथुनेत, ८ वा तूळेत व १२ वा कुंभेत असतील. (मिथुन रवी जून जुलै, – रवी- ऑक्टोबर-नोव्हेंबर, कुंभ रवी फेब्रुवारी- तूळ मार्च) या काळात घरगृहस्थीची चिंता राहील. धंद्यात मंदीचे वातावरण राहील. धंद्यात स्पर्धा जाणवेल. मोठे खर्च निघतील कोर्टाचे निकाल विरोधात लागतील. या वर्षी मंगळ वृषभ ते वृश्चिक राशीतून भ्रमण करील. वृषभेत मंगळ राशीला ३ रा असल्याने सुवर्णालंकरांची खरेदी करू शकाल. त्यानंतर मंगळ मिथुनेत (मार्च एप्रिल मे ) असताना पोटदुखीचा त्रास होईल. मंगळ कर्क व सिंहेत असताना (मे जून जुलै) शत्रू वाढतील. शुक्र राशीला ६ वा सिंहेत ७ वा कन्येत (ऑक्टोबर-नोव्हेंबर) धंद्यातील स्पर्धा वाढेल. भावनिक दडपर निर्माण होईल. शुक्र राशीला १० वा धनु राशीत (डिसेंबर २३ जानेवारी) असताना धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठे नुकसान होऊ शकेल. एकंदरीत साडेसातीच्या सुरुवातीलाच उत्तम गुरू येणे म्हणजे वाळवंटात हिरवळ पाहिल्यासारखे यावर्षात होईल.

Back to top button