Murder Case : आम्रपाली ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शर्मा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल, सात वर्षापूर्वीचे प्रकरण

Murder Case - Anil Sharma-Amrapali Group
Murder Case - Anil Sharma-Amrapali Group
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Murder Case : आम्रपाली ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शर्मा यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारच्या पाटण येथील बालिका विद्यापीठाचे तत्कालीन सचिवांच्या हत्येचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाने सीबीआयला तपास हातात घेण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल करताना सांगितले आहे की शैक्षणिक संस्थेची जमीन आणि मालमत्ता ताब्यात घेण्याचा हेतूने खून करण्यात आला.

लखीसराय येथील बालिका विद्यापीठाचे तत्कालीन सचिव डॉ.शरद चंद्र यांची ऑगस्ट २०१४ मध्ये कॅम्पसमधील त्यांच्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Murder Case : "आम्रपाली ग्रुपचे एमडी अनिल शर्मा यांनी राजेंद्र प्रसाद सिंघानिया, डॉ. प्रवीण कुमार सिन्हा, श्याम सुंदर प्रसाद आणि शंभू शरण सिंह यांच्या मदतीने बालिका विद्यापीठाचा विश्वास बळकावला होता," असा आरोप एजन्सीने केला आहे.

तपासात सीबीआयने म्हटले आहे की, शैक्षणिक संस्थेच्या मालकीची जमीन आणि मालमत्ता ताब्यात घेण्याचा हेतू होता. अनिल शर्मा याने अन्य काहींच्या मदतीने संस्थेची जमीन आणि मालमत्ता बळकावल्यानंतर चंद्रा यांना त्यांच्या पदावरून हटवले होते.

आरोपात असेही म्हटले आहे की, शरद चंद्रा यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दे्यात आली होती. तसेच खूनाच्या वेळी त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली. चंद्रा त्यांच्या बालकनीत न्यूजपेपर वाचत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

Murder Case : गेल्या महिन्यात चंद्रा यांच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती राजीव रंजन प्रसाद यांनी सीबीआयकडे हे प्रकरण हाताळण्यासाठी दिले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news